…अखेर शेतकरी कर्जमाफी कागदावर, अध्यादेश जारी

मुंबई | राज्य सरकारकडून ३४ हजार कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीचा अध्यादेश जारी करण्यात आलाय. या अध्यादेशात जमिनीची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही मात्र ३० जून २०१६ पर्यंतचं थकीत कर्जच माफ होणार आहे.

थकीत कर्जदारांची दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी याशिवाय नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल तिचा लाभ मिळेल. विशेष बाब म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या