शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेची फुल न फुलाची पाकळी!

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून सत्ताधारी शिवसेनेनं पुढाकार घेतलाय. आपल्या खासदार, आमदार आणि नगरसेवकांचं एक दिवसाचं मानधन शिवसेनेनं शेतकरी कर्जमाफीसाठी दिलंय. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुमारे 2 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. 

दरम्यान, शिवसेनेनं पुढाकार घेतला असला तरी शेतकरी कर्जमाफीचा बट्ट्याबोळ सुरुच आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.