Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर होणार!

Loading...

मुंबई | ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर केली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र, आज 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर केली जाणार आहे.

आजची शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी 19 जिल्ह्यात लागणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 19 जिल्ह्यातली कर्जमाफी दोन महिने रखडणार आहे. मात्र, बाकीच्या जिल्ह्यांची यादी आज जाहीर होईल.

ठाकरे सरकारने जाहिर केलेल्या पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावं जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पुढील यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.

दरम्यान,  आत्तापर्यंत 35 लाख कर्जदात्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आली आहे. सरकारच्या नियोजनाप्रमाणे सुरुवातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश यादीमध्ये करण्यात येईल. एप्रिलच्या शेवटपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

देशात जे काही होत आहे त्याला आपणच जबाबदार- मोहन भागवत

फडणवीसांच्या काळात सिडकोत घोटाळा झाल्याचा आरोप, कॅगचा ठपका?

महत्वाच्या बातम्या-

एनपीआर आणि एनआरसी महाराष्ट्रात नको- नवाब मलिक

कन्हैया कुमारला राष्ट्रगीताचा विसर; शेवटच्या दोन ओळीत घातला घोळ

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी; छगन भुजबळांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या