धक्कादायक!!! अवघे 5 हजार शेतकरीच कर्जमाफीचे लाभार्थी!

मुंबई | मोठी गाजत-वाजत आणि जाहिरातीबाजीवर उधळपट्टी करत सरकारने शेतकरी कर्जमाफी केली, मात्र या कर्जमाफीबाबत एक धक्कादायक बाब उजेडात आलीय. अद्यापपर्यंत फक्त 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याचं कळतंय. 

25 नोव्हेंबरपर्यंत 75 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. मात्र सरकारी पातळीवर सुरु असलेला घोळ पाहता 4 दिवसात हे होणं कितपत शक्य आहे, यावर प्रश्नचिन्हच आहे. 

दरम्यान, अद्याप 56 लाख 54 हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम नेमकी केव्हा मिळणार याचं उत्तर सध्या तरी सरकारकडे नसल्याचं दिसतंय.