Top News

“कलेक्टर साहेब एकतर कर्जमाफी द्या नाहीतर मरण्याची परवानगी तरी द्या”

पिंपळगाव |  कलेक्टर साहेब एकतर कर्जमाफी द्या नाहीतर मरण्याची परवानगी तरी द्या, अशी भावनिक मागणी पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकरी महिलेनं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

उत्पनाचं कोणतंही साधन नाही… पतीचं निधन झालेलं… अशातच बँकेने कर्जाच्या वसूलीचा तगादा लावला आहे… त्यामुळे या महिलेनं वैतागून कर्ज माफी द्या… अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, असं म्हटलं आहे.

मंगलाबाई देशुमख असं या शेतकरी महिलेचं नाव आहे. त्यांना एक मुलगी असून त्या मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना भेडसावत आहे.

दरम्यान, शासनाने कर्जमाफीची घोषणा केली खरी पण अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाहीय.

महत्वाच्या बातम्या-

आयसीसीचं खरयं, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायचं नसतं!

-भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली!!

शरद पवारांनी माढा ऐवजी साताऱ्यातून लढावं- रामराजे नाईक

-कुलदीप यादवने निवडलंय नवीन प्रोफेशन, तुम्ही वाचाल तर चकीत व्हाल!

-राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळेच काँग्रेस सोडली, माजी परराष्ट्रमंत्र्याचा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या