किसान सभेच्या 80 टक्के मागण्या मान्य, शेतकरी आंदोलन मागे

किसान सभेच्या 80 टक्के मागण्या मान्य, शेतकरी आंदोलन मागे

मुंबई | किसान मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरु असलेली बैठक संपली आहे. तब्बल तीन तास सुरु असलेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. 

वन जमिनीबाबत 6 महिन्यांच्या आत निर्णय घेणार, जीर्ण रेशन कार्ड 3 ते 6 महिन्यात बदलून देणार, आदिवासी भागात रेशन कार्ड 3 महिन्यात बदलून मिळणार, उर्वरित राज्यात जीर्ण रेशनकार्ड 6 महिन्यात बदलून  मिळणार, तसेच सर्वात महत्त्वाची मागणी असलेल्या वन हक्क कायद्याखालील अपात्र दावे 6 महिन्यात निकाली काढणार, असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय. 

दरम्यान, मान्य झालेल्या मागण्या मुख्यमंत्री स्वतः विधानसभेच्या पटलावर मांडणार आहेत. 

Google+ Linkedin