नवी दिल्ली | भारताचे माजी क्रेकेटपटू आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्ण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवरामकृष्ण यांच्या पक्षप्रवेशावेळी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष सी. टी. रवी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवरामकृष्णन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याचं बोललं जात आहे.
लक्ष्मण शिवरामकृष्ण यांनी टीम इंडियाकडून 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटीमध्ये 25 एकदिवसीय सामन्यात 16 बळी घेतले आहेत. याआधीही अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, किर्ती आझाद, विनोद कांबळी यांचा समावेश आहे.
दरम्यान, 1985 साली शिवरामकृष्णन यांनी पाकिस्तानविरूद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानतर त्यांनी सामन्याचं समालोचक केलं आहे.
Tamil Nadu: Former Indian cricketer Laxman Sivaramakrishnan joins Bharatiya Janata Party in Chennai. https://t.co/bE05u082hx pic.twitter.com/U5arZLrboQ
— ANI (@ANI) December 30, 2020
थोडक्यात बातम्या-
आई-बापाची भांडणं; आता पोरानं आईविरोधात ठोकला शड्डू!
दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री केजरीवालांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; वेतनात वाढ, सेवानिवृत्तीचं वयही वाढवलं
‘आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो….’; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका
Comments are closed.