Top News

उपाशीपोटी पुण्याच्या रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना जेवण आणा!

पुणे | ऊसाच्या एफआरपीच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेला शेतकरी पुण्यातील साखर संकुल येथे उपाशीपोटी रस्त्यावर बसला आहे. या शेतकऱ्यांना जेवण आणा, असं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं आहे. 

नोकरी किंवा व्यवसायानिम्मित पुणे येथे असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 1 किंवा 2 शेतकरी बांधवांसाठी आपल्या घरातून जेवण घेऊन या, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. 

एफआरपीनूसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, या मागणीवर खासदार राजू शेट्टी ठाम आहेत. मात्र साखर आयुक्तांनी यावर कोणतंही आश्वासन दिलं नाही. 

दरम्यान, पोटात अन्नाचा कण नसताना देखील शेतकरी भर थंडीत पुण्याच्या रस्त्यावर ठाण मांडून बसला आहे. सरकारला जाग कधी येणार?, असा प्रश्न आता विचारला जातोय. 

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून भर थंडीतही शेतकरी पुण्याच्या रस्त्यावर मुक्काम ठोकणार

-जालन्यात भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण

-शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार; अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेस नेते आणि कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याचं महिलेसोबत असभ्य वर्तन

-भाजप-शिवसेना युतीसाठी मी पुढाकार घेईन- महादेव जानकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या