Top News

दूध दरवाढीवरुन नगरच्या शेतकऱ्यानं महादेव जानकरांना शिव्या दिल्या!

अहमदनगर | दूध दरवाढीच्या मुद्द्यावरुन संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनं दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांना फोनवरुन शिवीगाळ केली आहे. नगर पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

नगरच्या मांडवे येथील शेतकरी सदाशिव निमसे यांनी महादेव जानकर यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी शिवीगाळ केल्याचा जानकर यांचा आरोप आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना फोनवरुन माहिती दिली. 

दरम्यान, निमसे सध्या फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक त्यांच्या मागावर असून ते सापडल्यावर त्यांची चौकशी केली जाईल, असं रंजनकुमार शर्मा यांनी म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप दहा तोंडी रावण आहे; विद्या चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल!

-आता भाजपला शिवाजी महाराज भलते वाटायला लागले आहेत- जयंत पाटील

-एक प्रियकर अन् दोन प्रेयसी; पहिलीनं दुसरीवर घडवून आणला बलात्कार!

-रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे नीरव मोदी आहेत; धनंजय मुंडेंचा आरोप

-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या