सोलापूर | कायम दुष्काळी भाग असा शिक्का बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातल्या शेतकऱ्यांनी आज पाण्याच्या मागणीसाठी फाशी आंदोलन केले. बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करून ते दुष्काळी भागाला द्यावं, अशी मागणी त्या शेतकऱ्यांची आहे.
निरा देवघर धरणाचं बारामती इंदापूर तालुक्यासाठी दिलेलं नियमबाह्य पाणी बंद करून ते लाभ क्षेत्रातील सांगोला, माळशिरस, फलटण, भोर आणि पंढरपूर या दुष्काळी भागासाठी द्यावं, अशी त्यांनी मागणी केली आहे.
नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद करून ते पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी कधी करणार हे मात्र सरकारने जाहीर केलेलं नाही.
दरम्यान, नीरा डावा कालव्याच्या पाणी प्रश्नावरून आता चांगलंच राजकारण तापायला सुरूवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-बाबासाहेब पुरंदरे म्हणतात देशसेवा म्हणून ‘हे’ काम करावं
-उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीवर काँग्रेसची बोचरी टीका
-उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर अशक्यच- रामदास आठवले
-अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलं ओपन चँलेज
अशोक चव्हाण यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट; काँग्रेसच्या गोटात खळबळ
Comments are closed.