मुख्यमंत्री गेलेला रस्ता शेतकऱ्यांनी गोमूत्र आणि दुधाने धुतला!

नाशिक | लासलगावमध्ये निषेधाचा एक नवाच प्रकार समोर आलाय. नैताळे गावात मुख्यमंत्र्यांचा ताफा गेलेला रस्ता शेतकऱ्यांनी चक्क गोमूत्र आणि दूध टाकून धुतला.

लासलगावमध्ये शीतगृहाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी केलेली घोषणाबाजी चर्चेत असताना आता शेतकऱ्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांचा ताफा या रस्त्यावरुन जात असताना सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

व्हिडिओ पाहण्यासाठी थोडक्यातचं फेसबुक पेज चेक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या