सोशल मीडियावरही घुमतोय #आक्रोश_बळीराजाचा….

मुंबई | शेतकऱ्यांचा आक्रोश घेऊन किसान सभेचा लाँग मार्च मुंबईमध्ये पोहोचला आहे. या लाँग मार्चचे पडसाद सोशल मीडियावरही पहायला मिळत आहेत. 

#आक्रोश_बळीराजाचा हॅशटॅग वापरुन अनेकजण व्यक्त होत आहेत. शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असताना शेतकरीपुत्रांनी त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी हा डीजिटल प्लॅटफॉर्म स्वीकारला आहे.

#आक्रोश_बळीराजाचा या हॅशटॅगसोबत #KisanLongMarch हा हॅशटॅगही वापरला जात आहे. हा हॅशटॅग ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये पोहोचला आहे. 

Kisan Long March - सोशल मीडियावरही घुमतोय #आक्रोश_बळीराजाचा....

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या