Top News देश महाराष्ट्र मुंबई

अबबबब… आतापर्यंत गप्प असलेल्या सेलिब्रेटींना एकाकी फुटली वाचा

Photo Credits- Sachin Tendulkar, Akshay Kumar, Ajay Devgn, Karan Johar & Ravi Shastri Twitter

नवी दिल्ली | दिल्लीतील लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. या प्रकारानंतर या आंदोलनाला फक्त देशातून नव्हे तर परदेशातूनही समर्थन मिळू लागलं. पॉपस्टार रेहानानं या आंदोलनाचं समर्थन केल्यानंतर एकच गदारोळ माजला आहे.

परदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यानंतर आतापर्यंत गप्प असलेल्या भारतीय सेलिब्रेटींना एकाएकी वाचा फुटल्याचं दिसत आहे. त्यांनी समर्थन किंवा विरोध करणं सोडा तर भारताच्या सार्वभौमत्त्वाच्या गप्पा सुरु केल्या आहेत.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, निर्माता दिग्दर्शक करण जोहर तसेच भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्वांच्या ट्विटचा धागा एकच आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होऊ शकत नाही. बाह्य शक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात, मात्र त्यात हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहीत आहे त्यांनी भारतासंदर्भात निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट होऊया, असं सचिन म्हणतो आहे.

 

शेतकरी हा आपल्या देशाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते स्पष्ट आहेत. चला मतभेद निर्माण करणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देण्याऐवजी एक मैत्रीपूर्ण ठराव समर्थित करूया…, असं अक्षय कुमार म्हटला आहे.

 

भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. या वेळेस एकत्र उभे राहणे महत्वाचे आहे, असं अभिनेता अजय देवगणनं म्हटलं आहे.

 

आपण अशांत काळात जगतो आहोत आणि या काळाची गरज म्हणजे प्रत्येक वळणावर विवेकीपणा आणि धैर्य सोबत असणे. चला आपण एकत्रितपणे, सर्वांसाठी उपयुक्त असे उपाय शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुया, आपले शेतकरी हे भारताचा आधार आहेत. कोणत्याही शक्ती आपल्याला फोडू शकत नाहीत, असं करण जोहनं म्हटलंय.

 

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी हा कोणत्याही देशाच्या इकोसिस्टमचा आधार असतो. ही एक देशांतर्गत बाब आहे, मला खात्री आहे की ती संवादातून सोडविली जाईल. जय हिंद!, असं रवी शास्त्रीनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

शेतकरी आंदोलन : सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्विटनं एकच खळबळ

मी राज्यपाल नाही, तर…- भगतसिंह कोश्यारी

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी मिया खलिफा नेमकी कोण आहे?, पाहा फोटो

मला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या