शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलं नाही, संपाबाबत संभ्रम

Photo- ANI

मुंबई | शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलं नाही, शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे आणि बुधाजीराव मुळीक यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना या प्रतिक्रिया दिल्या आहे. शेतकरी संप मागे घेण्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून हीच अनेक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे शेतकरी संपाबाबत संभ्रम कायम आहे. 

दरम्यान, पुणताब्यांतील शेतकरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नव्हे, ७० टक्के मागण्या म्हणजे नेमक्या कोणत्या, ही तर सगळी आश्वासनं आहे जशी निवडणुकीत दिलेली, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या