संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकरी नेत्यांची घोषणा

मुंबई | मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत ४ तास झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा यावेळी शेतकरी नेत्यांकडून करण्यात आला.

काय ठरलं?

थकीत कर्ज असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी

राज्य कृषिमुल्य आयोगाची स्थापना करणार

हमीभावापेक्षा कमी भाव फौजदारी गुन्हा ठरणार, त्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा करणार

दुधाचे भाव वाढवण्यासंदर्भात निर्णय घेणार

वाढीव वीजबिलाचा पुनर्विचार करणार

नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार

शेतकरी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार, राजकीय कार्यकर्त्यांविरुद्धचे नाही