Top News

राजू शेट्टी पांढऱ्या दुधातील काळा बोका; सदाभाऊ खोत यांच्या संघटनेची टीका

पुणे | तो स्वत:च पांढऱ्या दुधातील काळा बोका आहे, त्यांनी स्वत:च्या संघात तरी शेतकऱ्यांना योग्य दर दिला का? असा प्रश्न विचारत रयत संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी प्रसिद्ध पत्रक काढून राजू शेट्टी यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

शेट्टी हे दिल्लीत गेले आणि स्वत: दूध संघमालक झाले. जनतेचा राखणदार होण्यापेक्षा दुधातला बोका होण्यात धन्यता मानली. हे मान्य करुन आधी आत्मक्लेश करावा, असंही त्यांनी पत्रकात म्हटलंय.

निवडणुकीच्या तोंडावर दूध आंदोलनाची घोषणा केली आहे, या आंदोलनाला लोकसभा निवडणुकीचा वास आहे, आताप्रर्यत यांना शेतकऱ्यांचे प्रश्न का दिसले नाहीत?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-नितीश कुमार ठाम; आगामी निवडणुका मोदींसोबतच लढणार!

-भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी नतमस्तक!

-उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवलं- देवेंद्र फडणवीस

-लोकशाही वाचवण्यासाठी इमान जिवंत ठेवा- शरद यादव

-पोलीस गणवेशावर टिळा, गंडा-दोरे नकोत; आयुक्तांचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या