बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांचं ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ टी शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या!

बुलडाणा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात प्रचारसभांच्या निमित्ताने फिरत असताना ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असं सांगत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या 5 वर्षातला कामांचा दाखला देत आहेत. पण दुसरीकडे मुख्यमंत्री बुलडाणा दौऱ्यावर असताना एका शेतकऱ्याने ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ हे भाजपचं टी शर्ट घालून आपली जीवनयात्रा संपवली आहे.

शेगाव तालुक्यातील खातखेड या गावी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. 35 वर्षांच्या राजू ज्ञानदेव तलवारे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कर्जबाजारीमुळे तलवारे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री काही तासांतच मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या सभेसाठी येणार होते. मात्र त्यांच्या येण्याअगोदर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने कर्जमाफी नेमकी झाली का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी आत्महत्या झाल्याने तालुक्यात सरकारविरोधात रोष पहायला मिळाला.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More