उभ्या शेतातील पीक जळालं, शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

सोलापूर | पाण्याअभावी उभ्या शेतातील पीक जळत असल्याने माढ्यात जालिंदर महादेव सुतार या शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. ते सापटणे भोसे गावचे रहिवासी होते.

सिना-माढा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी टेल टू हेड येणे गरजेचे होते, मात्र अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे टेल भागात पाणीच आले नाही. शेवटी शेतातील भुईमूग-ज्वारी जळू लागल्यामुळे सुतार यांनी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सुतार यांच्यावर २ लाखाचं थकीत कर्जही आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या