नवी दिल्ली | 4 जानेवारीच्या बैठकीत सकारात्मक बोलणी न झाल्यास, आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास हरयाणातील सर्व मॉल, पेट्रोल पंप बंद करू, असा इशारा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
केंद्र सरकारसोबत येत्या 4 जानेवारीला होणाऱया बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी शुक्रवारी एक बैठक घेतली. त्यानंतर सिंघु सीमेवरील आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली.
सरकारने चारा आणि वीज कायद्यासंबंधी दोन मागण्या मान्य केल्या आहेत. आम्ही उरलेल्या दोन मागण्यांपासून मागे हटणार आहोत, असा याचा अर्थ होत नसल्याचं शेतकरी नेते गुरनाम सिंह यांनी केंद्र सरकारला सुनावलंय.
6 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च काढला जाईल तसेच हरयाणा आणि राजस्थानच्या सीमेवर आंदोलनाला बसलेले शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करतील, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिलाय.
थोडक्यात बातम्या-
“भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये”
“बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच केलं”
कंगणा राणावतच्या अडचणीत वाढ; कंगणाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली
संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊतांची इतक्या कोटींची संपत्ती जप्त!
“पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही”