बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू!

मुंबई | दोन दिवसांपूर्वी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होता. पण त्यांची आज प्राणज्योत मालवली.

सुभाष जाधव यांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शुक्रवारी मुंबईत मंत्रालय परिसरात आले.

सुभाष जाधव यांनी मंत्रालयात जाण्याचा प्रवेश केला. पण त्यांना मंत्रालयात आत प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोरच कीटनाशके पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून जाधव यांनी आपली व्यथा मांडली होती. आता या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. यावरून विरोधक धारेवर धरतील अशी चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या- 

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत तालिबान्यांकडून मोठं वक्तव्य; म्हणाले….

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’! भावांचं हे गिफ्ट बहिणींच्या आयुष्यभर राहणार लक्षात, पाहा व्हिडीओ

अफगाणिस्तानमधील वास्तव सांगताना खासदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More