‘तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा’; शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र
बीड | शिंदे गटात अनेक आमदार-खासदार, नेते सामील होत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कधीही कोसळण्याची शक्यता आहे. यातच बीडच्या एका शेतकऱ्यांने मला प्रभारी मुख्यमंत्री करा, असं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे.
हे पत्र या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने पाठवलं आहे. इतकंच नव्हे तर हे पत्र राज्यपालांकडे लवकरात लवकर पाठवावं, अशीही विनंती केली आहे. उपरोक्त विषयास अनुसरून विनंती अर्ज करतो की किसानपूत्र श्रीकांत विष्णु गदळे (Shrikant Vishnu Gadale ) रा. दहिफळ ता. केज जि.बीड येथील रहिवासी आहे. गेले 10-12 वर्षे राजकारण समाजकारण्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या प्रश्नांवर काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी वर्ग चिंतेत आहे. अपेक्षित अशी मदत सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही, असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षे सत्तेत राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे. या नैसर्गिक आपत्तीत सत्तेत राहून शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना हवी ती मदत मिळाली नाही. त्यामुळे मुख्यमत्र्यांना काळजीवाहू किंवा प्रभारी मुख्यमंत्रीपदावर नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी, असं ते पत्रात म्हणालेत.
मी जनतेचे प्रश्न मार्गी लावेन, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शेतमजूर, उसतोड कामगार यांचे प्रश्न सोडवेन. या सगळ्यांना न्याय देईन. यासाठी आपण माझी तात्काळ नियुक्ती करावी, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या
“महाविकास आघाडी सरकार पडतंय त्याचं मला दुःख नाही फक्त…”
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने शिंदे गटाला मोठा धक्का!
’50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमावलं’; निलेश राणेंचा पवारांना टोला
“शिवसेनेनं यापूर्वीही अशी गद्दारी पचवली, पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”
‘…असल्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
Comments are closed.