सांगली | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांसह शेतकरी महावितरणाविरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शेतीसाठी दिवसाही वीज द्या ही भूमिका ठामपणे मांडत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कोल्हापूरनंतर आता सांगलीतील शेतकऱ्यांना संताप अनावर झाला आहे. कोल्हापूरात आंदोलनाची धग कायम असताना अज्ञात शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील महावितरणाचे सबस्टेशन (MSEB) पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे सबस्टेशन पेटवून दिले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. कार्यालयातील महत्वाची कागदपत्र व इतर साहित्य या आगीत जळून खाक झालं आहे. महावितरण कार्यालयाला आग लागल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना शेतीसाठी 10 तास वीज मिळावी, वाढीव वीज कर रद्द करावा अशा अनेक मागण्यांसह कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. सरकारने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही. त्यातूनच महावितरण कार्यालय पेटवून दिलं असल्याची शंका व्यक्त होत आहे.
थोडक्यात बातम्या-
“उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही, विचार करा”
‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
“…तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”
“पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन”
‘आमरण उपोषण मागे घेणार नाही’; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं….
Comments are closed.