बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होणार, राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांनी शेतकऱ्याला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी नुकतंच हे स्पष्ट केलं आहे की, नवीन कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत.

कृषिमंत्री तोमर यांच्या या निवेदनानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले आहे. टिकैत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, आपल्यासोबत ट्रॅक्टर ठेवण्याची तयारी ठेवा. 24 ते 26 पर्यंत शेतकरी ट्रॅक्टर घेऊन येतील.

आता टँक, ट्विटर व ट्रॅक्टर हे तिन्ही चालवावे लागतील. आपलं मत मांडण्यासाठी ट्वीटर आवश्यक आहे. आंदोलनासाठी ट्रॅक्टर्स देखील आवश्यक आहेत, असं देखील टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनामध्ये टँक, ट्रॅक्टर्स पाहायला मिळतील.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातवरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी कायद्यांबद्दल काय तोडगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार भाडोत्री चाणक्याची भेट घेतात याचा अर्थ त्यांच्या राजकारणाचा अस्त”

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; ‘या’ दिवसापासून घेता येणार ऑनलाईन दर्शन

बच्चू कडूंचा गनिमी कावा! वेशांतर करुन शासकीय कार्यालयात गेले अन्…

मराठा आंदोलनावर खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा, म्हणाले….

मोठी बातमी! शिवसेना आमदार संजय रायमुलकरांनी ‘या’ कारणाने घेतली धरणात उडी; पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More