बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काढणीस आलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतापले; सोशल मीडियावर पसरतोय #सोयाबीन ट्रेंड!

मुंबई | देशभरात जुलै महिन्यात सोयाबीन या तेल कडधान्याचे प्रति क्टिंटल दर 10 हजारांच्या पार गेले होते. पण, मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण होत पाच ते साडेपाच हजारांवर येऊन थांबले आहेत. तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. देशातील महत्वाचं पीक म्हणून सोयाबीन या पिकाला शेतकरीवर्ग प्राधान्य देत आहेत.

सोयाबीनचे दर काही दिवसांतच तब्बल 50% घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. घसरलेल्या सोयाबीनच्या दरासाठी सोशल मीडियावर #सोयाबीन आणि #soyabean असा हॅशटॅग आज संध्याकाळी 6 वाजल्यापासुन ट्रेंड होताना दिसत आहे. #सोयाबीन ट्रेंडला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

सोयाबीनच्या घसरलेल्या दरासाठी शेतकऱ्यांच्या मुलांपासुन ते राजकारणातील नेते मंडळी आणि पत्रकार हा हॅशटॅग मध्ये सहभागी होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर फेसबुक, ट्विटर सारख्या माध्यमांवर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सप्टेंबर अखेरीस बाजारात शेतकऱ्यांची सोयाबीन येण्यास सुरूवात होईल. त्यामुळं काढणीला आलेल्या पिकाला भाव नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात केंद्र सरकारने 15 लाख टन सोयाबीन आयात केले आहे. सोयाबीन आयात करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने लेखी विरोध दर्शवला होता. त्यातच आता केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क देखील कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच 12 लाख सोयापेंड आयात करण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास केंद्र सरकारच्या निर्णयांमुळं हिरावून गेला आहे.

वाचा ट्विट –  

 

 

थोडक्यात बातम्या –

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांची प्राणज्योत मालवली, उद्या होणार अंत्यसंस्कार

”हा’ आजार दूर करण्यासाठी मद्यपान कर आणि शरीरसंबंध ठेव’; मुंबईच्या डॉक्टरचा मुलीला अजब सल्ला 

बाबो! रद्द झालेल्या न्युझीलंड दौऱ्यातील पाकिस्तानच्या सुरक्षा पोलिसांनी ‘इतक्या’ लाखांची बिर्याणी केली फस्त

घरगुुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

“…म्हणून मी ललित मोदींचं कौतुक केलं, बाकी काही नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More