बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार, अफगाणिस्तानवरुन तालिबानी नाहीत”

सांगली | गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्यात बैलगाडा शर्यतीवरुन पुन्हा एकदा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवावी म्हणून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी 20 ऑगस्टला सांगलीमध्ये भव्य बैलगाडा अर्था छकडा शर्यतीचं आयोजन केलंय. मात्र पोलीस आजपासून याठिकाणी नाकाबंदी करणार आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरून ठाकरे सरकार विरूद्ध गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी जोर धरला असून त्यांनी राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस आपल्या गृहखात्याच्या बलाचा उपयोग करुन बैलगाडा शर्यतीवर नाकाबंदी आणत आहे. ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे. या शर्यतीत फक्त शेतकरी येणार आहे कोणी अफगाणिस्तानवरून तालिबानी येणार नाहीत, अशी संतप्त टीका पडळकरांनी केली आहे.

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा होऊ देऊ नका असे आदेश गृहखात्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे 20 ॲागस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी 17 तारखेपासून म्हणजे आजपासूनच नाकाबंदी केली जात आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर विरूद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

विधान परिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती का रखडली?, मोठं कारण आलं समोर

फक्त 700 रुपयांमध्ये भारतात कुठेही करा विमानाने प्रवास, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला मदत करा!, अफगाणी विद्यार्थ्यांची विनवणी!

शहा-मोदींना भेटूनही पंकजा मुंडे नाराज?, त्यावर दानवेंनी केलं मोठं विधान

राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; पुढील 3 दिवस महत्वाचे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More