Top News पुणे महाराष्ट्र

“भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही”

पुणे | दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या 8 डिसेंबरला शेतकऱ्यांकडून ‘भारत बंद’चा इशारा देण्यात आला आहे. मात्र भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नसल्याचं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

सरकारने नविन केलेले कृषी कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरुपी बंद होईल. तसेच शेतकऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊ नये, असं देखील अनिल घनवट यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

घनवट म्हणाले की, “दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन पंजाब, हरियाणाच्या शेतकर्‍यांच्या फायद्याचे असले तरी देशातील शेतकर्‍यांच्या हिताचे नाही. सरकारने या आंदोलनाच्या दबावामुळे नवीन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले तर पुढील 50 वर्ष कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचे धाडस करणार नाही”.

दरम्यान, दिल्लीत शेतकर्‍यांनी एकजुटीची ताकद दाखवून सरकारला वाकवले हे कौतुकास्पद आहे. परंतू आता सरकार कायदे दुरुस्त करण्यास तयार झाले आहे तर शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवून चर्चेतून प्रश्न सोडवावा आणि  कायदे रद्द करण्या हट्ट सोडावा, असे मतं घनवट यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही”

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना पुरेशी मदत नाही, महाविकास आघाडीचं शेतकरी प्रेम नकली”

शेतकऱ्यांचा उद्या ‘हिंदुस्थान बंद’चा इशारा!

सिनेसृष्टीला धक्का! कोरोनामुळे ‘या’ अभिनेत्रीला गमवावा लागला आपला जीव

देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावं- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या