बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानंतर आता वाढतोय ‘हा’ आजार; शेतकऱ्यांना अधिक धोका

नागपूर | देशात आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र आहे. मात्र, काही ठिकाणी डेंग्यूचे रूग्ण वाढताना दिसतात. तर दक्षिण भारतात झिका व्हायरसचा धोका वाढत आहे. त्यातच आता विदर्भात शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. विदर्भात आता पुन्हा स्क्रब टायफसने डोकं वर काढलं आहे.

विदर्भात स्क्रब टायफसने पुन्हा डोकं वर काढल्यानं आता विदर्भातील शेतकरी आणि मजूर वर्गाची चिंता वाढली आहे. स्क्रब टायफसची सर्वात मोठा धोका शेतकरी आणि मजूर वर्गाला असल्याचं समोर आलं आहे. नुकतंच विदर्भात स्क्रब टायफसचे 4 रूग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. यात नागपूरातील 3 रूग्णांचा समावेश आहे. तर गोंदियातील 1 रूग्ण स्क्रब टायफसने ग्रस्त आहे.

2018 साली स्क्रब टायफसने विदर्भात धुमाकूळ घातला होता. स्क्रब टायफसमुळे 30 हूण अधिक रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा हा आजाराचा फैलाव होताना दिसतोय. ओरेएन्शिया सुसुमागिया या जंतूंने शरिरात प्रवेश केल्यानं स्क्रब टायफस हा आजार होतो. शेतात, गवतात असलेल्या उंदरांच्या माध्यातून हा जंतू सर्वत्र पसरतो. व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेच्या माध्यमातून हा रोग पसरताना दिसतोय.

दरम्यान, ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कोरडा खोकला अशी या आजाराचूी लक्षणं आहे. किटक चिकटले असल्यानं अंगावर खाज येते आणि अंगावर चट्टे उमटतात. दंश झालेल्या ठिकाणी जखम होते आणि खपली धरते. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि मजुरांना याचा मोठा धोका आहे. त्यामुळे काम करताना हातमोजे आणि गमबूट घातल्यानं संसर्ग टाळता येऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

सैफचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अरं थांब गड्या नको घेऊ! …अन भारताने दुसराही डीआरएस गमावला तरीही विराट पंतवरच बिघडला

राज्यात शेतजमीन खरेदी- विक्री करत असाल तर वाचा हे नियम , नियमात झाले मोठे बदल!

भारताला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू 28 व्या वर्षीच निवृत्त, आता खेळणार ‘या’ देशाकडून!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More