बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची आज ‘भारत बंद’ची हाक!

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची सगळीकडेच चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. आज केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं ‘भारत बंद’ची हाक पुकारली आहे. या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

कृषी कायदे हटवणं आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संप 10 व्या महिन्यात पोहोचला आहे. यामुळे आता भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. आज भारत बंद सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे.

आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भारत बंदमुळे काही राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

दरम्यान, बंद दरम्यान देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील. मात्र रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील.

थोडक्यात बातम्या – 

पुढील 3 तासात राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“…नाहीतर ओवैसींना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचं अंगवस्त्र म्हणून पाहिलं जाईल”

चिंताजनक! कोरोनामुळे कुपोषणाचा धोका वाढलाय, डाॅक्टरांचा गंभीर इशारा

“ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”

“बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण तो देखील जिंकू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More