Top News देश

कौतुकास्पद! गोशाळेत काम करत शेतकरी कन्येने केला अभ्यास आता बनणार न्यायाधीश

नवी दिल्ली | ‘नियतीलासुद्धा कष्टापुढं झुकावं लागतं’, या म्हणीला उदयपूरच्या शेतकरी कन्या सोनल शर्माने खरं ठरवलं आहे. गोशाळेत काम करणाऱ्या सोनलने राजस्थानमधील न्यायिक सेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

राजस्थानच्या सत्र न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणून सोनल शर्मा नियुक्त होणार आहे. 26 वर्षाय सोनल ही दुध विक्रेत्याची मुलगी आहे. लहानपणापासून वडिलांच्या गोठ्यात स्वच्छता करत वडिलांना मदत करत तिनं आपलं स्वप्न पुर्ण केलं आहे.

न्यायालयीन परीक्षांचा निकाल 23 डिसेंबरला लागला. यामध्ये सोनलला जेव्हा समजलं की आपला नंबर लागला आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, ‘मला नेहमी न्यायाधीश व्हायचं होतं, मी न्यायाला मी एका पुरस्कृत नोकरीच्या रूपात मानते.

दरम्यान, मी लहानपणापासून गरिबी पाहिली आहे. त्यामुळे मला गरिबांच्या प्रश्नांची जाण आहे. मला सुरूवातील माझ्या वडिलांचा व्यवसाय सांगताना लाज वाटायची पण आता अभिमान वाटत असल्याचं सोनलने सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या-

थोरातांची परवानगी घेत काँग्रेसकडून लढताना वाचलेला निधी उर्मिलांनी CM फंडात दिला!

लोकसभा अध्यक्षांची लेक बनली आयएएस, पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या