कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना तब्बल १५ पानांचा अर्ज भरावा लागणार!

मुंबई | कर्जमाफी पदरात पाडून घ्यायची असेल तर शेतकऱ्यांना १५ पानी अर्ज भरुन द्यावा लागणार आहे. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे का नाही?, असा प्रश्न काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विचारलाय.

सरकार निवडणूक समोर ठेवून शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती गोळा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच हा फॉर्म सोपा असल्याचा दावा सरकार करत असेल, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊंनी तो भरून दाखवावा, मी त्यांचा सत्कार करेन, असंही ते म्हणाले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या