अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले आहे.

मु्ख्यमंत्री म्हणाले होते की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे लक्ष देऊ नका. पण ग्रामीण भागात जनावर राहतात का ? असा सवाल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

सत्ताधारी पक्षाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी प्रचार सभेदरम्यान निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे बॅनर दाखवले. सभेनंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्याला ‘योग सिटी’ अशी ओळख मिळवून देणार; गिरीश बापटांची ग्वाही

-…म्हणजे कळेल तुम्ही कोणामुळे निवडून आलात; उदयनराजेंचा चंद्रकांत दादांना टोला

‘यापुढे असं बोलायचं नाही’; भरसभेत शरद पवारांची अमरसिंह पंडितांना ताकीद

-प्रणिती शिंदेचा थेट प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल!

-भाजप प्रणीत एनडीए सरकारला 350 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा दावा