बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबादमधील शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत; तब्बल 7 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

औरंगाबाद |  राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पीक विमा दिला जातो. औरंगाबाद जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पिकांच नुकसान झालं होतं. औरंगाबाद जिल्ह्याला 555.39 कोटी इतकी आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. ही मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषातील देय मदतीपेक्षा जास्त असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एनडीआरएफच्या देय निकषापेक्षा 170.46 कोटींचे अतिरिक्त अर्थसाहाय्य औरंगाबाद जिल्ह्याला करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जून महिन्यापासुन राज्यात मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडला. बळीराज्याच्या हाताशी आलेल पिक पाण्यात गेलं. शेतात असलेलं कापूस, तुर, सोयाबिन मातीमोल झालं. राज्य सरकारने शेतकऱ्यांना पिकविम्याची मदत जाहीर केल्यामुळे दिलासा मिळणार आहे.

एनडीआरएफच्या निकषांनुसार औरंगाबादला 384.93 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली असती. राज्य सरकारच्या पॅकेजमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 555.39 कोटी मदत देण्यात आली. मदतीच्या स्वरूपामध्ये जिरायतीसाठी 10 हजार रूपये, बागायतसाठी 15 हजार आणि वार्षिक पिकांकरिता 25 हजार प्रति हेक्टर मदत करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री तसेच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. त्यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सुभाष देसाई यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यामुळे जिल्हातील शेतकऱ्यांना यावर्षी बऱ्यापैकी मदत मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या वादात जावेद अख्तरांची उडी, म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय”

“मला शिव्या दिल्या म्हणजे मतं मिळतील असा भाजपचा समज झालाय”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये ‘राष्ट्रीय नेतृत्व’ करण्याची क्षमता”

“…म्हणून शिवसेनेतून एक टपरीवाला आज मंत्री होऊ शकतो”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More