बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“….म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत”

मुंबई | मुंबईतील कथित क्रुझ ड्रग्ज प्रकरण सध्या राज्यात चांगलंच चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या नेत्यांमध्ये याच कारणावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण होताना दिसत आहे. यातच आता राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना खोचक पत्र लिहीत हर्बल तंबाखूच्या लागवडीस परवानगी देण्याची मागणी केली आहे.

आपल्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. कोरोनाकाळात कसाबसा टिकूून राहिलेला शेतकरी अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूरसारख्या अस्मानी संकटात सापडला असताना मरणप्राय वेदना भोगत आहेत. आपल्या सारखे शेतकरी शेतीतील जाणते गुरू असूनही महाविकास आघाडी सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्यानं अनेक शेतकरी राज्यात गळफास घेत आत्महत्या करत आहेत.

राज्यात गांजासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करण्यासाठी परवानगी द्यावी. जी सहजासहजी मिळत नाही. पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या मंत्र्याच्या जावयाकडे हर्बल तंबाखू असल्याचं आपण सांगितलंत. मलिकांचे जावई मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचं पाहायला मिळाल्यानं राज्यातील शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. आपणास विनंती आहे की, आपण तात्काळ हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी परवानगी द्यावी, असं पत्र सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लिहीलं आहे.

दरम्यान, जेणेकरून राज्यातील गरीब शेतकरी आणि कष्टकरी शेतमजूर नवाब मलिकांच्या जावयाप्रमाणे श्रीमंत होतील, असं खोत यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

अबब! 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने नाकारली भारतीय प्रशिक्षकपदाची ऑफर

आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांची; प्रविण दरेकरांचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

नगरमधील एका बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- राधाकृष्ण विखे पाटील

“मोदी सरकारला अर्थकारण-प्रशासन कळत नाही फक्त उद्योगपती मित्रांचं हित समजतं”

वाढत्या इंधन दराबाबत चिंता व्यक्त करत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण, म्हणाल्या….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More