बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर आंदोलनात मी स्वत: सहभागी होईल- अण्णा हजारे

राळेगणसिद्धी | आपल्या महाराष्ट्रासाठी आंदोलन आणि अण्णा हजारे हे समानार्थी शब्दच आहेत. लोकपाल आंदोलनापासून आजपर्यंत अण्णा नेहमी न्याय आणि हक्कांसाठी उभे ठाकलेले पहायला मिळतात. शेतकरी, व्यापारी, कामगार, हे आपल्या अडचणी घेऊन अण्णा हजारे यांना भेटत असतात. व त्या अडचणी सोडवण्याचं अण्णा आश्वासन देतात.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादनास स्थानिक शेतकरी हे विरोध करत आहेत. या रेल्वेच्या माध्यमातून शेतीयोग्य जमीन ही या प्रकल्पासाठी वापरली जाणार असल्याने येथील शेतकरी या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेत आहेत. अन् यासाठी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी कृती गट बनवला आहे.

शेतकरी कृती समिती व शेतकरी बांधवांनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली व आपली समस्या सांगितली. पुणे-नाशिक या हायस्पीड रेल्वेमुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन त्यांची घरं आणि बागायती जमीन रेल्वे मार्गात जाणार आहेत. या प्रकल्पामध्ये येणार जुन्नर तालुक्यातील खूप क्षेत्र हे बागायती आहे. तालुक्यामध्ये धरणे, कालवे आहेत. या आधीच पुणे-नाशिक महामार्गासाठी तालुक्यातील खूप लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. रेल्वेमार्गात आणखी जमीन गेल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत.

अनेक जणांचे कुटुंब हे शेतीवरच अवलंबुन असल्याने त्यांच्यासाठी हे मोठ संकट आहे. येथील शेतकरी हे शेतीला जोडव्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायाला पण हानी होणार आहे. शेतकऱ्यांना रेल्वेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या सर्व अडचणी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आण्णांनी वेळ आलीच तर तुम्ही आंदोलन करा मी स्वत: येतो, असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

“ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर”

कांस्य हुकलं पण मन जिंकलं; रोमहर्षक सामन्यात भारताच्या लेकी शेवटपर्यंत ब्रिटनला भिडल्या

“कोण अमृता फडणवीस?, नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था”

“संजय राऊत, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा”

“मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला तर त्याचं श्रेय देखील घ्या पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More