Top News देश

‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दिड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. तरी देखील सरकार यावर अजूनही तोडगा काढू शकलं नाही. अशातच कर्नाटकातील कोलार येथील भाजप खासदार मुनीस्वामी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

हे आंदोलन फसवं असून, शेतकरी पैसे घेऊन आंदोलन करत असल्याचा दावा भाजप खासदार मुनीस्वामी यांनी केला आहे.

मुनीस्वामी म्हणाले की, “दिल्लीतील आंदोलनात बहुतांश दलाल आहेत किंवा तोतये शेतकरी आहेत. या आंदोलनादरम्यान शेतकरी पिझ्झा, बर्गर आणि केएफसीमधून ऑर्डर करून जेवत आहेत. आंदोलन सुरू असलेल्या भागात एक जीमही सुरू करण्यात आली आहे. आता हे नाटक बंद झाले पाहिजे.”

दरम्यान, आंदोलन आणि कृषी कायद्यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे. जर कृषी कायद्यांना स्थगिती देण्यास सरकार तयार नसेल तर आम्ही स्थगिती देऊ, अशा शब्दात सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला खडसावलं.

थोडक्यात बातम्या-

त्यांनी मुख्य हायवेने न जाता शाॅर्टकट घेतला आणि तिथंच घात झाला!

कौतुकास्पद! चौथीपर्यंत शिकलेल्या आजोबांनी तयार केली 4 भाषांमध्ये डिक्शनरी

भंडारा आग प्रकरण; त्यानं जीवाची बाजी लावली नसती तर आणखी मोठा अनर्थ…

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

…अन् इंदोरीकर महाराज ढसाढसा रडले; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या