बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

11 महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आंदोलन मात्र सुरूच; पण आता पुढे काय?

नवी दिल्ली | केंद्र सरकारने आणलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. 26 नोव्हेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला सुरूवात केली. शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात सुरू केलेल्या या आंदोलनाला आज 11 महिने पूर्ण झाले आहेत. 11 महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चांच्या अनेक निष्फळ फेऱ्या झाल्या.

11 महिन्यांपासून आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही, त्यात लखीमपूर खेरी येथे आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्याने शेतकरी अधिकच आक्रमक झाले. आज सर्व आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने देशव्यापी निषेध व्यक्त केला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चा शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत.

या दरम्यानच लखीमपूर खीरी हिंसाचार घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्राच्या वडिलांना अर्थात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री पदावरून काढून टाकण्याची मागणी देखील केली जाणार आहे. अजय मिश्रा यांना अटक व्हावी आणि या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने देशभरातील जिल्हा मुख्यालयावर निदर्शने केली जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या या मागण्याबाबत किसान मोर्चाच्या वतीने राष्ट्रपतींकडे निवेदनही पाठवण्यात येणार आहे. शेतकरी आंदोलनाला सुरूवात झाल्यापासून यात अनेक घडामोडी घडल्या. चर्चांच्या अनेक फेऱ्या, अनेकदा देशव्यापी आंदोलने तर शेतकऱ्यांसाठी भारत बंदची हाक देखील देण्यात आली पण त्यातुन काहीच हाती आलं नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन 11 महिन्यांनंतरही चालूच आहे. त्यामुळे यावर आता तरी काही तोडगा निघणार की या आंदोलनाला नवं वळण लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना?, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती

“…तोपर्यंत समीर वानखेडे यांनी राजीनामा द्वावा”

एनसीबीमधील ‘Special-26’चा खुलासा होणार; नवाब मलिक लवकरच करणार नवा गौप्यस्फोट

WANTED! किरण गोसावीच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांनी उचललं ‘हे’ पाऊल

पुण्यातील ‘हा’ गंभीर मुद्दा गेला थेट नितीन गडकरींच्या दरबारी; महापौर भेटीसाठी जाणार दिल्लीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More