बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘येत्या 9 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर…’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

कोल्हापूर | नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. शेतकऱ्याचे जमा होणारे अनुदान अजूनही झाले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

राजू शेट्टींनी कोल्हापुरातील दसरा चौकातील जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसवर (Collector’s Office) मोर्चा काढला होता. याचं कारण म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात 1 जुलै रोजी 50 हजार रूपये जमा होणार होते मात्र ते आद्याप झाले नाहीत. याबाबत शेट्टी आक्रमक झाले आहेत.

येत्या 9 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर क्रांती राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी शिंदे सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) साहेब ही पोकळ धमकी नाही, 10 वर्षांपूर्वी महामार्गावर काय झालं होतं? ते पोलिसांना विचारून घ्या, अस म्हणाले. तसेच काल अनुदान संदर्भात खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली यासंबधी त्यांचा समाचारही घेतला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला होता. त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता तेच निघूून गेले. आधी शेतकऱ्याचे पैसे भरा. नुस्ता फोटो टाकू नका. नाहीतर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरु देणार नाही, असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा

आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…

‘द्रौपदी मुर्मूंकडून दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More