बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतमालाला ग्राहक नाही; संतप्त शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली |  भाजप नेते आणि खासदार वरूण गांधी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेताना दिसत आहेत. आता वरूण गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील बाजार समिती परिसरातील शेतकऱ्यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. धान्याची विक्री करण्यासाठी काही शेतकरी भटकत होते. परंतु, धान्याची विक्री न झाल्याने त्यांनी धान्याला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ट्विटमध्ये वरूण गांधी यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशचे शेतकरी समोध सिंह गेल्या 15 दिवसांपासून धान्य विकण्यासाठी मंडईमध्ये भटकत होते. मात्र, ज्यावेळेस आपल धान्य विकलं जात नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नैराश्याने धान्य पेटवून दिले आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्यावरून ट्विट करत वरूण गांधी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून काही सवाल उपस्थित केले आहेत. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना कुठे उभे केले आहे? असा सवाल वरूण गांधी यांनी उपस्थित केला आहे. तसेच कृषी कायद्यावरूनही त्यांनी सरकारचे कान टोचले आहेत. केंद्र सरकारने कृषी धोरणाचा विचार करणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक लोकांना अन्न आणि पाणी देखील मिळत नाही. पुरामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल नष्ट झाला आहे. वरूण गांधी यांनी या शेतकऱ्यांची मदत केली आहे. पुराचा फटका बसलेल्या लोकांना रेशन पुरवलं होतं. ज्यावेळेस सर्वाधिक गरज असते तेव्हा त्याला स्वत: मदत शोधावी लागते हे खूप वेदनादायी आहे, असं म्हणत वरूण गांधी यांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे.

पाहा ट्विट- 

थोडक्यात बातम्या- 

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

“भारत पाकिस्तान सामना होणं हे राष्ट्रहिताच्या विरोधात”

‘क्रूझ पार्टीमध्ये राज्यातील ‘तो’ मंत्री सहभागी’; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

अमेरिकेची सीरियामध्ये मोठी कारवाई! अल कायदाच्या हल्ल्याला जशास तसं उत्तर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More