देश

“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”

नवी दिल्ली | नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात आले आहेत, असं सरकार सांगत आहे. मात्र कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान होणार आहे हे सरकारने स्पष्ट करावं, असं आंदोलक शेतकऱ्यांचं मत आहे.

राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या राज्यातून शेतकरी आलेले आहेत. हे तीन कायदे मागे घेतल्याशिवाय येथून हटणार नाहीत, असं शेतकऱ्यांनी म्हटलंय.

येथून जिंकूनच परत जाणार आहोत. अन्यथा, येथेच बसून राहणार आहोत. फुटणार नाहीत, तुटणार नाहीत, असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. ही लढाई आता केवळ शेतकऱ्यांची राहिलेली नाही. ही लढाई आता श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आहे, असं मुरादाबादचे शेतकरी धर्म पाल यांनी म्हटलंय.

केंद्र सरकार जोवर कृषी कायदे रद्द करुन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही, असा पवित्रा दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून 17 नंबरचा अर्ज भरता येणार!

औषध आणि काळजी हाच नववर्षाचा मंत्र- नरेंद्र मोदी

‘बिगर मुस्लीमांच्या नावाने रस्त्यांचं नामकरण व्हायला हवं’; भाजप खासदाराची मागणी

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार- चंद्रकांत पाटील

कोरेगाव भीमाला जाणारच, प्रसंगी न्यायालयात जाऊ- चंद्रशेखर आझाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या