Top News देश

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर…”

नवी दिल्ली | सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर 26 जानेवारीला राजपथवर शेतकरी मोर्चा काढू. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातून एका सदस्याला पाठवावं, असं आवाहन ‘स्वराज इंडिया’चे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केलं आहे.

23 जानेवारीला प्रत्येक राज्यातील राज्यपालांच्या निवासस्थानावर स्थानिक शेतकऱ्यांनी धडक देण्याचंही आवाहन केलं. क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी 26 जानेवारी रोजी राजपथवर ट्रॅक्टर मोर्चाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तिन्ही कृषी कायदे परत घ्या आणि एमएसपी कायदा लागू करा, यासाठी शेतकरी अडून आहेत. सरकार या मागण्या मान्य करायला तयार नाही. सरकार-शेतकऱ्यांमधील बैठका निष्फळ ठरत आहेत. थंडीने गारठलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान,  क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी 26 जानेवारी रोजी राजपथवर ट्रॅक्टर मोर्चाची तयारी करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा अनेकांनी विडाच उचलला होता, पण…”

खळबळजनक! तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर थेट तलवारीनं वार

जळगाव हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पतीनंही प्राण सोडले

‘…तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता’; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र

मी हा विचार कधीही केला नव्हता; ‘या’ गोष्टीबद्दल सनी लिओनीचा मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या