बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

नवी दिल्ली | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण आलं आहे. दिल्लीमध्ये आंदोलकांनी पोलिसांसमोर तलवारी बाहेर काढल्याने परिस्थिती चिघळली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करत लाठीचार्ज केला.

शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. आंदोलन हिंसक वळण घेत असल्याने दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन पोलिसांच्या दिशेनं धाव घेतली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही आंदोलनकर्ते तलवारी, लाठ्या आणि काठ्या घेऊन पोलिसांवर हल्ला करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा’; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही साधला राज्यपालांवर निशाणा; म्हणाले…

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More