Top News देश

शेतकऱ्यांचा उद्या ‘हिंदुस्थान बंद’चा इशारा!

नवी दिल्ली | कृषी कायदा मागे घ्यावा यासाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला 11 दिवस उलटल्यानंतरही केंद्रातील मोदी सरकार यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे.

याच पार्श्वभूमीवर संतप्त शेतकरी संघटनांनी आता आर या पारचा इशारा दिला असून, उद्या म्हणजेच मंगळवारी 8 डिसेंबर रोजी ‘हिंदुस्थान बंद’चा इशारा दिला आहे.

या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठीशी देशातील 18 प्रमुख शाखांसह असंख्य संघटनांनी पाठींबा देत बळीराज्याचा आवाज बुलंद केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी दिल्लीकडे येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. कोणत्याही परिस्थीत कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलनही मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान,  केंद्र सरकारने 9 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. या बैठकीत सरकार काय चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सिनेसृष्टीला धक्का! कोरोनामुळे ‘या’ अभिनेत्रीला गमवावा लागला आपला जीव

देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावं- संजय राऊत

राजधीनीतील कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचे लंडनमध्येही पडसाद

उदय सामंतांनी प्राध्यापकांसाठी केली ही मोठी घोषणा!

डाॅ. शीतल आमटे प्रकरणाचा तपास घातपाताच्या दिशेने?; १६ जण ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या