बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज’; हसन मुश्रीफ यांची घोषणा

कोल्हापूर | कोरोना काळात अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. श्रीमंतापासून सामन्यांपर्यंत अनेकांचे हाल झाले. तर दुसरीकडे बळीराजा देखील संकटात सापडला होता. या काळात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. केंद्र सराकरा आर्थिक कचाट्यात सापडल्यानं काही बँकांच्या व्याजदरात देखील वाढ केली आहे. त्यातच आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी पाच लाखांपर्यंत पीक कर्ज देण्यात येणार आहे. बॅकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बॅकेच्या 83 व्या सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली आहे. याआधी शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची मर्यादा ही 3 लाख इतकी होती.

बँकेचे सभासद असलेल्या लाखो शेतकऱ्यांनी याबाबत मागणी केली होती. त्यामुळे अखेर बँकेने हा निर्णय घेतला आहे. शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी केडीसीसी ही देशातील पहिलीच बँक असल्याचं देखील मुश्रीफ यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या 6 वर्षापासून ही बँक तोट्यात होती. या बँकेवर तब्बल 103 कोटींचं कर्ज होतं. आता हा तोटा भरून काढून बँकेने 145 कोटींचा नफा कमवला आहे. या बँकेत सध्या 7,141 कोटींच्या ठेवी आहेत.

थोडक्यात बातम्या-

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! गुलाब चक्रीवादळामुळे ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“मी खूप नशिबवान, कोरोनामुळे माझा जीव वाचला”

…तर मग कर्णधारची गरजच काय?; KKRच्या ‘त्या’ कृतीवर गौतम गंभीर भडकला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाले…

“शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला की भाजपच्या पोटात दुखतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More