‘या’ योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला 3000 रुपये

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी (Farmers) नवनवीन योजना घेऊन येत असतं. नुकताच सादर झालेल्या बजेटमध्येदेखील शेतीला प्रोत्साहन देणारे अनेक निर्णय घेण्यात आलं असल्याचं पहायला मिळालं. देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या योजना राबवण्यात येतात.

पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) याचाच एक भाग आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून काही रक्कम दिली जाते. काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेतील 13 व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. अशीच एक दुसरी योजना आहे ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना महिन्याला 3000 रुपये मिळू शकतात.

या योजनेचं नाव आहे पीएमकिसान मानधन योजना(PM Kisan Gratuity Scheme). पीएम किसान मानधन योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेत नोंदणी करणं गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. 18 ते 40 वयोगटाचा कोणताही शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो.

यासाठी देशातील लहान आणि सिमांत शेतकरीच (Marginal farmers) अर्ज करु शकतात. तसेच 2 हेक्कर पेक्षा कमी जिरायती जमीन हवी. या योजनेत 55 रुपये गुतंवून 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना 3000 रुपये पेन्शन मिळू शकते. वार्षिक 36,000 रुपये इतकी पेन्शन मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या