बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी जिंकले, SP सचिन पाटलांची बदली थांबली; बदलीसाठी झटणारा आमदार कोण?

नाशिक | नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची होणारी बदली न्यायालयाने रोखली आहे. सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली होती. मात्र त्यांची बदलीच्या सुचना देण्यात आली होती. यानंतर शेतकरी सचिन पाटील यांच्या पाठीशी असल्याचं दिसतं आहे.

सचिन पाटील यांच्या जागी शहाजी उमाप पोलीस अधिक्षक पदाचा कारभार स्वीकरणार होते. पाटील यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागात उपायुक्तपदी बदली झाली होती. मात्र न्यायालयाने त्याआधीच त्यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. राज्यातील 32 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. यात सचिन पाटलांचा देखील समावेश होता.

गणेश विसर्जन झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना सोडण्यात येणार होतं. मात्र कार्यकाळ पुर्ण न झाल्यानं केवळ आमदाराच्या पत्रावर बदली करण्याचा निर्णय न्यायालयाने फटकारलं आहे. त्यानंतर सचिन पाटलांची बदली स्थगित झाली आहे.

दरम्यान, सचिन पाटलांनी राबवलेल्या मोहीममुळे त्यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. अशातच सचिन पाटील यांची बदली स्थगित करण्यात आल्याने पत्र लिहिणारे आमदार नक्की कोण? याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“बेईमानी करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला, पोलीस केसचं काय ते मी बघून घेईल”

#IPL2021 दोन आक्रमक संघ भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

FD धारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ 3 बॅंकांनी बदलले एफडीचे व्याजदर

‘चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही’; पाटलांच्या टीकेवर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

…अन् रिमझिम पावसामुळे इमारत पत्त्यासारखी कोसळली; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More