हा देश तुमच्या बापाचा आहे का?, फारुख अब्दुल्ला भडकले

नवी दिल्ली | हा देश तुमच्या बापाचा आहे का? असा सवाल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. भाजपचे नेते विनय कटियार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अब्दुल्ला भडकले आहेत. 

भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानमध्ये निघून जावं, असं धक्कादायक विधान विनय कटियार यांनी केलं होतं. हा देश कटियार यांच्या बापाचा नाही. हा देश माझा आणि सर्वांचाच आहे, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान, ज्या लोकांना समाजा-समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा आहे, तेच लोक अशा प्रकारची वल्गणा करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केलीय.