“राम पृथ्वीवर आला तर अच्छे दिन येणार आहेत का?”

नवी दिल्ली| प्रभू श्रीराम स्वर्गातून पृथ्वीवर अवतरला तर शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत का? असा परखड सवाल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुला यांनी विचारला आहे.

लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तुम्ही का बोलत नाही? तुम्ही केवळ राम मंदिरावरून भांडत आहात, अशी जळजळीत टीका त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी आग्रही असणाऱ्यांवर केली.

सध्या देशात केवळ लोकांना मूर्ख बनविण्याचं काम सुरू आहे, अशा शेलक्या शब्दात त्यांनी भाजपला लक्ष्य केलं.  

दरम्यान, जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून माझ्यावर हल्ला झाला- रामदास आठवले

-“लष्कराचा वापर खासगी संपत्तीप्रमाणे करताना मोदींना शरम वाटत नाही”

-…या तारखेपासून राष्ट्रवादीमध्ये होणार मोठी घरवापसी

-आठवलेंच्या मारहाणीनंतर कार्यकर्ते संतप्त; आरपीआयची आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

-केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर अंबरनाथमध्ये हल्ला