‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर आधी…’; फारूख अब्दुलांच्या वक्तव्याने खळबळ
नवी दिल्ली | राहुल भट या तरूणाच्या हत्येनंतर काश्मिरी पडिंतांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा वर आला आहे. या हत्येच्या घटनेनंतर गदारोळ पाहायला मिळत असताना जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काश्मिरी पंडितांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. असं असताना जर काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर काश्मीर फाईल्स या सिनेमावर बंदी घालावी, असा सल्ला फारूख अब्दुल्ला यांनी दिला आहे.
काश्मीर फाईल्स या निराधार सिनेमाने देशात केवळ द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे जर काश्मिरी पंडितांची हत्या रोखायची असेल तर ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमावर बंदी घालावी, असं वक्तव्य फारूख अब्दुल्ला यांनी केलं.
दरम्यान, फारूख अब्दुल्ला यांच्या वक्तव्याने काश्मीर फाईल्स चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राहुल भट या तरूणाच्या हत्येवरून वातावरण तापलं असताना आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण देखील पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
“फक्त वाघाचे छायाचित्र काढून वाघ होता येत नाही, त्यासाठी…”
राष्ट्रवादीविरोधात नाना पटोलेंची सोनिया गांधींकडे तक्रार; अजित पवार म्हणतात…
काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, नाना पटोले स्पष्टच बोलले
हार्ट अटॅक येण्याआधी दिसतात ‘ही’ लक्षणं; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं, म्हणाले ‘येणाऱ्या काळात…’
Comments are closed.