बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काश्मीरमध्ये बनतोय ज्वालामुखी; फारुख अब्दुल्लांचा भाजपवर हल्लाबोल

जम्मू काश्मीर |  जम्मू-काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील सुरनकोट इथं झालेल्या सभेत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 370 वे कलम हटवल्यापासुन एक ज्वालामुखी तयार होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक होईल तेव्हा त्याची तीव्रता किती असेल?, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

370 वे कलम रद्द केलेल्या भाजपला डिवचण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा सुरु असताना काश्मीर खोऱ्यात भारताविरूद्धच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला असल्याचं अब्दुल्ला यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, जल्लोष करणाऱ्यांना पाकिस्तानशी काही घेणं देणं नाही, ती मुलं तरुण आहेत आणि त्यांच्या या कृतीमुळं तरी भाजपचे डोळे उघडावेत आणि त्यांनी 370 वे कलम काश्मीरला परत करावे.

भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्वामुळे जम्मू काश्मीरच्या जनतेचं सँडविच झालं आहे आणि यामुळेच हिंदू-मुस्लिमात व्देश निर्माण होत आहे, असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले. दोन्ही देशातील राजकीय पक्ष काश्मीरच्या मुद्द्याचे भांडवल करतात, पाकिस्तान म्हणते काश्मीर आमच्या कंठाची रक्तवाहीनी आहे, पण काश्मीरच्या जनतेला काय वाटतं?, हे मात्र कुणीच विचारत नाही. आमचे 75 वर्षे हाल झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

‘370’ व ‘35 अ’ ही दोन कलमे हटवल्यानंतर एकही गोऴी झाडली गेली नाही, असा दावा भाजप करत आहे, पण तुम्ही प्रत्येक घरासमोर एक जवान उभा केलात तर गोळ्या कशा झाडणार?, असा सवालही अब्दुल्ला यांनी विचारला. भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा व्हावी, दोन्ही देशांत सलोख्याचं वातावरण निर्माण होण्यासाठी लोकांनी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

थोडक्यात बातम्या

“ते आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील”

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांच्या मासिक वेतनाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

शेतकऱ्यांनो आता सातबारा काढा घरच्या घरी आपल्या मोबाईलमध्ये; कसं ते वाचा सविस्तर

समीर वानखेडेंचा आणखी एक जुना फोटो शेअर करत मलिक म्हणतात, मला तर…

“आर्यन खानला फसवण्यात आलं असून, समीर वानखेडेंची नोकरी जाणार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More