पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच, त्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत!

श्रीनगर | पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग असून त्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत, असं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काॅन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केलंय.

श्रीनगरमध्ये जाहीर सभेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे, त्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत. भाजपनं आधीच पाकिस्तानची निर्मिती केलीय. देशाचे आणखी किती तुकडे करायचेत?, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीर भाजपचाच भाग असल्याचं वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. पीओके परत मिळवू असं केंद्रीय मंत्री हंसराज अहिर म्हटले होते.